वर्धा जिल्हा (महाराष्ट्र)

देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | नागपूर विभाग |
मुख्यालय | वर्धा |
लोकसंख्या | १२,९६,१५७ (२०११) |
लोकसंख्या घनता | २०५ प्रति चौरस किमी (५३० /चौ. मैल) |
साक्षरता दर | ८७.२२% |
प्रमुख शहरे | वर्धा व सर्व तालुके |
जिल्हाधिकारी | श्री विवेक भीमनवार ,आय.ए. एस |
सध्या अस्तित्वात असलेला वर्धा जिल्हा १८६२ पर्यंत नागपूर जिल्ह्याचा एक भाग होता. पूढे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने वर्धा जिल्हा वेगळा करण्यात आला आणी पुलगाव जवळील कवठा येथे जिल्हा मुख्यालय ठेवण्यात आले होते. सन १८६६ मध्ये जिल्हा मुख्यालय पालकवाडी (वर्धा) येथे हलविण्यात आले होते. वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा नदी ही अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे कर