उस्मानाबाद जिल्हा (महाराष्ट्र)

देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | औरंगाबाद विभाग |
मुख्यालय | उस्मानाबाद |
लोकसंख्या | १६,६०,३११ (२०११) |
लोकसंख्या घनता | २२१ प्रति चौरस किमी (५७० /चौ. मैल) |
साक्षरता दर | ७६.३३% |
प्रमुख शहरे | उस्मानाबाद व सर्व तालुके |
जिल्हाधिकारी | दीपा मुधोळ-मुंडे |
उस्मानाबाद जिल्हा राज्याच्या दक्षिण भागात स्थित आहे.उस्मानाबाद जिल्हा हा मराठवाडयात त्याच्या नैर्ऋत्येला आहे. हा जिल्हा समुद्रसपाटीपासून ६०० मी. उंचीवर असून पूर्णपणे दख्खनच्या पठारात येतो. ह्या जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा नद्यांची पात्रे येतात.उस्मानाबादच्या नैर्ऋत्येला सोलापूर जिल्हा, वायव्येला अहमदनगर जिल्हा, उत्तरेला बीड जिल्हा, पूर्वेला लातूर जिल्हा, व दक्षिणेला कर्नाटकातील बिदर व गुलबर्गा हे जिल्हे आहेत.जिल्ह्याचा बहुतांश भाग खडकाळ तर उर्वरित भाग सपाट आहे.जिल्ह्याचा बहुतांश भाग बालाघाट नावाच्या लहान पर्वताने व्यापलेला आहे. भूम, वाशी, कळंब, उस्मानाबाद आणि तुळजापूर हे तालुके बालाघाटच्या रांगेत स्थित आहेत. गोदावरी आणि भीमा सारख्या मोठ्या नद्यांचा काही भाग जिल्ह्याच्या अंतर्गत येतो.जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२.४ चौ.किमी आहे पैकी शहरी भागाचे क्षेत्रफळ २४१.४ चौ.किमी आहे(एकूण क्षेत्रफळाच्या ३.२१ %) आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ ७२७१.० चौ.किमी आहे (एकूण क्षेत्रफळाच्या ९६.७९ %).