नागपूर जिल्हा (महाराष्ट्र)

देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | नागपूर विभाग |
मुख्यालय | नागपूर |
लोकसंख्या | ४६,५३,१७१ (२०११) |
लोकसंख्या घनता | ४७० प्रति चौरस किमी (१,२०० /चौ. मैल) |
साक्षरता दर | ८९.२५% |
प्रमुख शहरे | नागपूर व सर्व तालुके |
जिल्हाधिकारी | श्री. सचिन कुर्वे |
नागपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात मोडतो. हा नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी असून, भारताचा शून्य (0) मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. देशच्या मध्यभागात असल्याने देशातील महत्त्वाचे लोहमार्ग व महामार्ग नागपूर जिल्ह्यातून जातात. नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे.