जालना जिल्हा संपर्क प्रमुख

hero

मा .श्री.आकाश डी. जाधव

जालना जिल्हा (महाराष्ट्र)

content
देश  भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
मुख्यालय जालना
तालुके • जालना • अंबड • भोकरदन 
• बदनापूर • घनसावंगी • परतूर  
• मंठा • जाफ्राबाद
लोकसंख्या ७,६१२ चौरस किमी (२,९३९ चौ. मैल)
लोकसंख्या घनता २५७ प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल)
साक्षरता दर ७३.६१
लिंग गुणोत्तर १०७ ♂/♀
प्रमुख शहरे जालना व सर्व तालुके
जिल्हाधिकारी रविन्द्र बिनवडे
लोकसभा मतदारसंघ जालना (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ बदनापूर (अनुसूचित जाती), भोकरदन, घनसावंगी,जालना,परतूर
खासदार रावसाहेब दानवे

जालना जिल्‍हा हा भारतातील महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो. जिल्‍ह्याचे अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय स्‍थान म्‍हणजे १९.१ उत्तर ते २१.३ उत्तर अक्षांश व ७५.४ पूर्व ते ७६.४ पूर्व रेखांश.. जालना जिल्‍हा हा पूर्वी निजामाच्या राज्‍याचा भाग होता. नंतर मराठवाडा मुक्‍ती संग्रामानंतर तो औरंगाबाद जिल्‍ह्यामधील एक (जालना) तालुका झाला. जालना हा औरंगाबादच्या पूर्वेकडील तालुका १ मे १९८१ रोजी ‘जिल्‍हा’ झाला. औरंगाबाद जिल्‍ह्यातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड हे ४ तालुके व परभणी जिल्‍ह्यातील परतूर असे एकूण पाच तालुके जालना जिल्‍ह्यामध्‍ये समाविष्ट झाले. जालना जिल्‍ह्याच्‍या पूर्वेस परभणी व बुलढाणा जिल्‍हा असून, औरंगाबाद जिल्हा पश्‍चिम दिशेला आहे. उत्तरेला, जळगाव जिल्हा असून दक्षिणेस बीड जिल्‍हा आहे. जालना जिल्‍ह्याचे मुख्‍यालय जालना शहर असून ते महाराष्ट्र राज्‍याच्‍या व भारताच्या राजधानीशी ब्रॉडगेज रेल्‍वे लाईनने जोडलेले आहे. राज्‍यातील मुख्‍य शहरे देखील जालन्याशी राज्‍य महामार्गांनी जोडलेली आहेत. जालना जिल्‍हा हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्‍टील रिरोलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदा. दाल मिल, बी-बियाणे, तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे. जालना जिल्‍ह्यातील जनतेने मराठवाडा मुक्‍ती संग्राम महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. जनार्दन मामा नागापूरकर यांनी मातृभूमीसाठी आपल्‍या प्राणांची आहुती दिली आहे. हा जिल्हा संकरित बियाणे-प्रक्रिया सारख्या कृषि-आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेंजो शीतल हे संकरित बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६५०-७५० मि.मी. इतके आहे. तरीसुद्धा अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. जिल्ह्याची ७५% जमिनीवर खरीप पिके निघतात, तर त्यांतली ४०% रब्बी पिकांखाली येतो. ज्वारी, गहू व इतर धान्ये, कापूस ही प्रमुख पिके आहेत. जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जालना (शहर) असून ते हातमाग व यंत्रमाग द्वारे कापड बनविण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. बिडीचेही कारखाने आहेत.

© 2020 Jayrudrafoundation