हिंगोली जिल्हा (महाराष्ट्र)

content
देश  भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
मुख्यालय हिंगोली
लोकसंख्या ११,७८,९७३ (२०११)
लोकसंख्या घनता २६० प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल)
साक्षरता दर ७६.०४%
प्रमुख शहरे हिंगोली व सर्व तालुके
जिल्हाधिकारी श्री. सुनील भंडारी

हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे. हिंगोलीच्या उत्तरेस वाशिम जिल्हा व यवतमाळ जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा व आग्नेयेस नांदेड जिल्हा आहे, आताचा हिंगोली जिल्हा हा १ मे १९९९ पूर्वीपर्यंत परभणी जिल्ह्याचा एक भाग होता. त्या दिवशी औंढा, बसमत, हिंगोली, कळमनुरी व सेनगांव हे तालुके असलेला हा स्वतंत्र जिल्हा घोषित झाला. हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४५२६ चौरस कि.मी.२ आहे. एकूण लोकसंख्या ९,८७,१६० तर साक्षरता ६६.८६% इतकी आहे. जिल्ह्यातील गोंधळ, शाहिरी, भारूड, पोतराज व कलगीतुरा या लोककला प्रसिद्ध आहेत. ज्वारी व कापूस ही जिल्ह्याची मुख्य पिके आहेत.

© 2020 Jayrudrafoundation