गडचिरोली जिल्हा (महाराष्ट्र)

content
देश  भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव नागपूर विभाग
मुख्यालय गडचिरोली
लोकसंख्या 10,71,795(२०११)
साक्षरता दर ७०.६ %
प्रमुख शहरे गडचिरोली व सर्व तालुके

गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. जिल्हा जवळपास ७६ % जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्सल समर्थक लोक आश्रय घेतात. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४,४१४ चौ.कि.मी आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.

© 2020 Jayrudrafoundation