भंडारा जिल्हा (महाराष्ट्र)

content
देश  भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव नागपूर विभाग
मुख्यालय भंडारा
लोकसंख्या ११,९८,८१० (२०११)
लोकसंख्या घनता ३२३/किमी२
साक्षरता दर ८३.७६ %
प्रमुख शहरे भंडारा व सर्व तालुके

भंडारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा राज्याच्या ईशान्य भागात आहे. भंडार्‍याची लोकसंख्या ११,९८,८१० आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६ चौरस किलोमीटर आहे. हा जिल्हा तळ्यांसाठी व सुगंधी तांदुळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. याला तलावाचा जिल्हा म्हटले जाते. भंडार्‍यात ३,६४८ लहान लहान तळी आहेत. हा जिल्हा वनसंपत्तीत व खनिजसंपत्तीत समृद्ध आहे. भंडारा शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

© 2020 Jayrudrafoundation