बीड जिल्हा (महाराष्ट्र)

देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | औरंगाबाद विभाग |
मुख्यालय | बीड |
लोकसंख्या | २५,८५,९६२ (२०११) |
लोकसंख्या घनता | २४१ प्रति चौरस किमी (६२० /चौ. मैल) |
साक्षरता दर | ७३.५३% |
प्रमुख शहरे | बीड व सर्व तालुके |
जिल्हाधिकारी | श्री.राहुल रेखावार |
बीड जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी आहे. जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात हिंदी व्यतिरिक्त मराठी, उर्दू, तेलुगू या भाषादेखील बोलल्या जातात.बीड जिल्ह्यातील माजलगाव हा एक सधन तालुका आहे. बीड जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाविषयी पुराणांमधून उल्लेख येतो असे सांगतात.