औरंगाबाद जिल्हा संपर्क प्रमुख
औरंगाबाद जिल्हा (महाराष्ट्र)

देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | औरंगाबाद विभाग |
मुख्यालय | औरंगाबाद |
तालुके | • औरंगाबाद • खुलताबाद • सोयगांव • सिल्लोड • गंगापुर • कन्नड • फुलंब्री • पैठण • वैजापूर |
लोकसंख्या | ३७,०१,२८२ |
लोकसंख्या घनता | ११,७५,११६[१] (२०११) |
साक्षरता दर | ६१.१५% |
प्रमुख शहरे | औरंगाबाद व सर्व तालुके |
जिल्हाधिकारी | श्री. उदय चौधरी |
औरंगाबाद हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे.औरंगाबाद शहरातील ५२ दरवाजे व खिडक्या प्रसिद्ध आहेत. सद्यस्थितीतील यातील अनेक दरवाजे हे शेवटची घटका मोजत आहेत. औरंगाबादला जागतिक महत्त्व आहे. औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. औरंगाबादला राजतडाग , खडकी , फतेहपूर म्हणून सुद्धा ओळखले जाते. औरंगाबाद शहरातील दरवाजे पुढील प्रमाणे आहेत. भडकल गेट, मकई गेट, दिल्ली गेट, रोशन गेट, पैठण गेट, रंगीन दरवाजा, कटकट गेट, जाफर गेट, बारापुला गेट, नौबत गेट, हाथी गेट, नूर गेट इ. आहेत. सध्या काही दरवाजे हे इतिहास जमा झाले आहेत. एकूण ५२ पैकी २१ दरवाजे व १ खिडकी उभी आहेत. औरंगाबादचे विशेष असे की या शहराला ५२ दरवाजे, ५२ खिडक्या आणि ५२ पुरे (बेगमपुरा, उस्मानपुरा इ.) होते. महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र आहे. ते मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. औरंगाबाद हे नाव औरंगजेब (इ.स. १६५९ - इ.स. १७०७) ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून त्याच्या मृत्यूनंतर ठेवले गेले असावे. जुने नाव खडकी होते. औरंगाबादला ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादेत आहे. औरंगाबाद हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्यौगिक शहर आहे. हे मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे.